...तर निलंबनाची कारवाई ; प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटलांना इशारा
...तर निलंबनाची कारवाई ; प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटलांना इशारा
img
दैनिक भ्रमर
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबावतंत्राचा वापर सुरू आहे. प्रदेश काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांना मेसेज देण्यात आला आहे. बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात आला आहे. 

विशाल पाटील यांना थांबवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न

त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी विशाल पाटील यांनी माघारीबाबत अजून कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगलीच्या जागेसाठी मतदान होणार असून उद्या 22 एप्रिल हा उमेदवारी माघारीसाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने विशाल पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात? याची उत्सुकता आहे. सांगलीमध्ये अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये पूर्णतः सक्रिय नसल्याने सुद्धा ठाकरे गटामध्ये नाराजी आहे. दुसरीकडे विशाल पाटील यांना भाजपच्या दोन माजी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, आघाडी धर्म पाहता विशाल पाटील यांना प्रदेश काँग्रेसकडून माघार घेण्यासाठी माघार घेण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय ; भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका

दरम्यान, विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिल्यास चंद्राहार पाटील सांगलीच्या लढतीत तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि संजय पाटील अशीच लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना थांबवण्यासाठी आता प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते चंद्रावर पाटील यांच्या प्रचारामध्ये दिसत आहेत. मात्र, काँग्रेसकडून अजूनही सक्रीय सहभाग दिसलेला नाही. दुसरीकडे, दिल्लीतून विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांची समजून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र,विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक आहेत. 

संजय राऊतांची भाषा बदलली 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आठवडाभरापूर्वी झालेल्या दौऱ्यामध्ये आमदार विश्वजित कदम यांच्यावर टीका केली होती. तसेच विरोधी आमदारांची भेट घेतल्याने सुद्धा वातावरण तापले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्यानंतर संजय राऊतांच्या भाषेत बदल झाल्याने सांगलीत भूवया उंचावल्या गेल्या. संजय राऊत यांनी शिवसेना आणि वसंतदादा पाटील यांचे संबंध कसे होते, हे सांगतानाच उद्धव ठाकरे यांचंही विशाल पाटील यांच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा असून ते चुकीची भूमिका घेणार नाहीत, असेही म्हटले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group