उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय ; भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका
उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय ; भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका
img
दैनिक भ्रमर
ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरे यांनी केली, उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते का बिघडलं याचा शोध घेत असल्याचं म्हणत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली, तर तुमच्या शैलीत किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत उत्तर देणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे जी आपलं मानसिक संतुलन का बिघडलं आहे, याचा शोध आम्ही घेतोय. आम्हाला वाटतंय की, चतुर्वेदी यांच्यावरी कारवाई, आदित्य ठाकरे यांच्यावरील कारवाई या सगळ्यामधून तुमचा बोलता कोंबडा या गोष्टींमध्ये तुम्हाला बोलतंय आणि त्या तोंडून तुम्ही जी आक्षेपार्ह भाषा वापरताय. तीही राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल ज्यांना राज्यामधेच नाही तर देशामध्ये मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रेम आहे. 

बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत उत्तर देणार

फडणवीसांबद्दल अशाप्रकारची खालची भाषा तुम्ही केलीत, तर तुम्ही कोणत्या थराला जात आहात, हे आम्हाला कळतंय. ती भाषा आम्हालाही वापरता येते, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, त्यामुळे आम्ही ती भाषा वापरणार नाही, पण वेळोवेळी अशा भाषेचा वापर झाला, तर निश्चितपणे त्याचं जोरात उत्तर तुम्हाला तुमच्या स्टाईलमध्ये किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत तुम्हाला द्यावं लागेल, असं मला वाटतंय, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group