धक्कादायक: मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?
धक्कादायक: मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथील परिस्थिती बिघडलेली आहे. कुकी आणि मैतेई लोकांमध्ये सुरू असलेली हिंसा अद्यापही थांबण्याचे नाव नाही.  येथे थोड्या बहुत शांततेनंतर पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. संरक्षण करणाऱ्या जवानांवरही हल्ले केले जात आहेत. अशाच मणिपुरमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मणिपूरमध्ये एका भारतीय जवानाचे अपहरण करून, त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा जवान सुट्टीवर आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला. 

संबंधित जवानाचे नाव सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असल्याचे समजते. ते आर्मीच्या डिफेन्स सिक्योरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनता होते. ते पश्चिमी इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी होते. संबंधित जवानाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा चिमुकलाही तेथेच होता.  

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपॉय कोम सुट्टीवर आपल्या घरी आले होते. सकाळच्या सुमारास 10 अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय कोम यांचे त्यांच्या घरून अपहण केले. केवळ त्यांचा 10 वर्षांचा मुलगाच या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षिदार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने सांगितले आहे की, तीन लोक त्यांच्या घरात शिरले होते. तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत घरात काम करत होता. शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय यांच्या लोक्याला पिस्तुल लावले आणि त्यांना एका पांढऱ्या वाहनात बसून नेले. लष्करातील जवानांना सीपॉयच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. मृत जवानावर कुटुंबाच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

इतर बातम्या
Join Whatsapp Group