एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचा खोळंबा; 'हे' कारण आले समोर?
एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचा खोळंबा; 'हे' कारण आले समोर?
img
Dipali Ghadwaje
विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एअर इंडियाने तब्बल ७० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत ७० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, राहतील, असं एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून टाटा आणि एअर इंडियाचा कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. आधीच विस्ताराला वैमानिकांच्या कमतरतेमुळे ऑपरेशनल समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

त्यातच आता एअर इंडिया एक्स्प्रेसचे क्रू मेंबर्स एकाचवेळी सुट्टीवर गेले आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने एअर इंडियावर ७० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. अचानक विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 


एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, "एअरलाइनच्या केबिन क्रूच्या एका गटाने मंगळवारी रात्री शेवटच्या क्षणी आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या. ज्यामुळे फ्लाइटला उशीर करावा लागली आणि फ्लाइट रद्द करण्यात आली"

"या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. एअरलाइन टीम सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत आणि समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइन दिलगिरी व्यक्त करतो". "फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल. किंवा इतर तारखेला फ्लाइट निश्चित होईल, असंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांचे उड्डाण रद्द झाले आहे की नाही हे तपासावे", असे आवाहन देखील एअर इंडियाकडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group