नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा सहप्रवाशावर लघुशंका करण्याचा विकृत प्रकार समोर आला आहे.
दिल्ली ते बँकॉक विमानात भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आली. सदर प्रकरणानंतर एअर इंडियाच्या केबिन क्रू सदस्यांनी आरोपी प्रवाशाला इशारा देऊन सोडण्यात आलं.
एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?
एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 दिल्लीहून बँकॉकला निघालं होतं. यावेळी बिझनेस क्लासमध्ये एका पुरुष प्रवाशाने एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यावर लघुशंका केली. लघुशंका करणारी व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आले.
ही घटना विमान बँकॉकमध्ये उतरण्यापूर्वी घडली. लघवी करणारी व्यक्ती बिझनेस क्लासमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सीटवर होती. ज्या व्यक्तीवर त्याने लघवी केली तो देखील बिझनेस क्लासमध्ये होता.
सदर घडलेल्या प्रकरणानंतर क्रू मेंबर्सनी पीडित प्रवाशाला तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र पीडित व्यक्तीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.