राज्यातील मुंबईत सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. तसेच कोकणातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. काल (रविवार) दुपारनंतनंर किल्ले रायगड परिसरात झा लेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटर्यकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्रजें मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
दरम्यान आज (सोमवा र) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडा वर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटर्यकांना पोलीस यंत्रयंणेद्वारे रोपवेच्या माध्यमा तून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासना मार्फत देण्यात आली आहे.
सध्यास्थितीत किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर तसेच नाणे दरवाजा येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग शिवभक्त पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्याचप्रमाणे रोपवे प्रशासनाने देखील आगामी 21 जुलै पर्यंत रोपोरे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.