धक्कादायक..! व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या
धक्कादायक..! व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
पुणे :  आत्महत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कामावरुन काढल्याने आणि व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , विशाल प्रमोद साळवी (वय-36 रा. पंचशीलनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आयटी कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशाल यांची बहीण प्रीती अमित कांबळे (वय-42 रा. पिंपळे गुरव) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्य़ादी प्रीती यांचा भाऊ विशाल साळवी हा येरवडा येथील कॉमर झोन परिसरातील एका आयटी कंपनीत कामाला होता. व्यवस्थापक झिशान याने विशाल याला इतर कामगारांसमोर अपमानित केले. कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर विशाल याला कामावरुन काढून टाकले. कामावरुन काढून टाकल्याने विशाल याने 21 जून रोजी रात्री बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली.

विशाल याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपर व्यवस्थापक झिशान हैदर याचा फोटो स्टेटसला ठेवला होता. तसेच कंपनीच्या व्यवस्थापकामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. चिठ्ठी लिहून विशाल याने नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे, फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन चोरमले करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group