पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये देशाचे नेतृत्व करतील. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदाची थीम आहे ‘विकसित भारत’. या वर्षीची ‘विकसित भारत’ थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे आणी भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणे यावर आधारित आ हे . विकसित भारत’ वर लक्ष केंद्रित करून भारत आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. यावर्षी 15 ऑगस्ट 2024 उद्या (गुरुवारी) साजरा केला जाणार आहे, यावेळीस ‘विकसित भारत’ या थीमवर लक्ष केंद्रित केले जात आहे. ‘2047’ ला भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतात, त्याच अनुषंगाने ‘विकसित भारत’ थीमचे उद्दिष्ट भारताला 2047 पर्यंत प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सशक्त राष्ट्र बनवणे हे आहे
स्वातंत्र्य दिन-2024 काय असेल खास?
दरवर्षी प्रमाणे, यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचतील, जिथून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. या ऐतिहासिक स्थळावर पंतप्रधान दरवर्षी देशाला संबोधित करतात. पंतप्रधानांच्या आगमनावेळी सशस्त्र दल आणि पोलीस दलाच्या जवानांकडून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि एकतेचे प्रतीक असलेला हा महत्त्वाचा क्षण आहे. ध्वजारोहण समारंभानंतर "जन गण मन" हे राष्ट्रगीत वाजवले जाते. यासोबत 21 तोफांची सलामी दिली जाते, जो एक पारंपारिक लष्करी सन्मान आहे. तर राष्ट्रगीत आणि सलाम हे राष्ट्राभिमान आणि देशाचा आदर दर्शवितात.
पंतप्रधानांचे भाषण
कार्यक्रमानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. यानंतर भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दर्शविणारी भव्य परेड होते. भारतीय सशस्त्र दल, भारतीय पोलीस आणि राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या विविध रेजिमेंट राष्ट्रीय अभिमान आणि एकता प्रदर्शित करण्यासाठी यात सहभागी होतात. या परेडमध्ये भारताचा समृद्ध वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान लष्करी प्रदर्शन आणि इतर घटकांचा समावेश आहे.