दैनिक भ्रमर : १५ ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशवासीयांनी आठवडाभरापूर्वीपासूनच स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित करत असतात. तुम्हाला देखील मित्रपरिवार, नातेवाईकांना १५ ऑगस्ट शुभेच्छा पाठवायचे असतील खालील शुभेच्छा संदेश नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.
१) नको जातीचा भेद, नको धर्माचा द्वेष,
एकजुटीने बांधूया, नवा आणि समृद्ध देश.
स्वातंत्र्याच्या या दिवसाचे, करूया आज स्मरण,
हे स्वातंत्र्य जपण्यासाठी, घेऊया नवी शपथ, नवा प्रण.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
२) अखंड राहो विविधतेतील एकता;
अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयंना हार्दिक शुभेच्छा !
३) प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे , सन्मान देशाचा वाढत जावो,
सण स्वातंत्र्याचा चिरायू होवो! उत्सव स्वातंत्र्याचा
सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा !
४) अखंड राहो विविधतेतील एकता;
अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयंना हार्दिक शुभेच्छा !
५) विविधतेत एकता आहे आमची शान
म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान
जय हिंद...जय भारत
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
६) आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा
भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा
घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा
साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
७) कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारे
प्रेम म्हणजे देश प्रेम,
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !
८) आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा
भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा
घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा
साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
९) उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांना, ज्यांनी भारत देश घडविला
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
१० ) शक्ती, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे तिरंगा
केवळ ध्वज नाही तर भारतीयांची ओळख आहे तिरंगा
एकता ही भारताची आहे शक्ती
ही ओळख जपणेहीच खरी देशभक्ती
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
११ ) तिरंग्याच्या छायेत उभं आयुष्य,
स्वातंत्र्याच्या मातीचा सुवास,
वीरांची गाथा अनंतकाळ,
भारतीयत्वाचा करूया विकास!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!