सुखोईचे हार्ड लँडिंग, धावपट्टी एक तासासाठी बंद; विमानतळाचे वेळापत्रक बिघडले
सुखोईचे हार्ड लँडिंग, धावपट्टी एक तासासाठी बंद; विमानतळाचे वेळापत्रक बिघडले
img
Dipali Ghadwaje
सराव संपवून पुणे विमानतळावर लँड होत असताना सुखोई विमान आठ ते दहा फूट उंचीवरून खाली आदळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुखोईच्या या हार्ड लँडिंगमुळे धावपट्टीचे काही नुकसान झाले का? हे पाहण्यासाठी हवाई दलाने सुमारे 40 मिनिटांसाठी धावपट्टी बंद केली होती. यामुळे पुणे विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टी प्रवासी विमानांसाठी बंद केली होती. तर चार विमानांचा मार्गात बदल आणि सात ते आठ विमानांना उशीर झाला.

नेमकं काय घडले? 

हवाई दलाचे देशात विविध ठिकाणी बेस स्टेशन आहे. त्यापैकी एक म्हणजे पुणे विमानतळ. पुणे विमानतळावर नेहमी सुखोईच्या वैमानिकाचा सराव सुरू असतो. नेहमी प्रमाणे सरावा दरम्यान, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सुखोई विमान लँडिंग करत असताना अचानक आठ ते दहा फूट उंचीवरून धावपट्टीवर आदळले. सुदैवाने या घटनेत लँडिंग गियरचे काही नुकसान झाले नाही; मात्र सुखोईचे वजन आणि वेगाचा परिणाम धावपट्टीवर होऊ शकतो हे लक्षात घेत तातडीने उपाययोजनेच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यात आली. कारण, नुकसानग्रस्त धावपट्टीमुळे प्रवासी विमानांना लँडिंग करताना अपघाताचा धोका असतो. 

त्यामुळे हवाई दलाने तत्काळ एअरमनला नोटीस देत सर्व विमानांसाठी धावपट्टी एक तासासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यानी धावपट्टीची पाहणी केली आणि तासभरानंतर धावपट्टी खुली करण्यात आली. दरम्यान, या कालावधीत विमानतळाचे वेळापत्रक बिघडले होते. 

या विमानांना वळविले 

  • इंडिगोचे दिल्ली-पुणे विमान मुंबईला वळविले
  • इंडिगोचे चेन्नई-पुणे विमान हैदराबादला वळविले
  • विस्ताराचे दिल्ली-पुणे विमान मुंबईला वळविले.
  • एअर इंडियाचे बंगळूरु-पुणे विमान पुन्हा बंगळूरुला परतले
  • यासह सात ते आठ विमानांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे एक ते दीड तासाचा उशीर झाला

यासाठी ठेवली धावपट्टी बंद

खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळाची धापट्टी बंद ठेवण्यात आली होती. करण, सुखोईचे वजन साधारणपणे 18 हजार ४०० किलो इतके आहे. तर वेग सरासरी वेग 2390 किलोमीटर प्रति तास इतका आहे. लँडिंगवेळी सुखोईचा वेग सुमारे 230 किलोमीटर इतका असतो. इतक्या वेगाने विमान खाली आदळल्यास धावपट्टीचे नुकसान होत धावपट्टीवर छोटे खड्डे अथवा माती उखडली जाण्याची शक्यता असते. धावपट्टीवरचे हे नुकसान अन्य प्रवासी विमानांच्या टायरला धोका होऊ शकतो. त्यात विमान घसरण्यापासून ते इंजिनमध्ये छोटे दगड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विमानाचा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे धावपट्टी बंद करत धावपट्टीची पाहणी केली जाते. यात धावपट्टीचे काही नुकसान झाले आहे का? हे पाहिले जाते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group