महत्वाची बातमी :
महत्वाची बातमी : "हे" विमानतळ होणार बंद
img
Dipali Ghadwaje
पुणे : विमान प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावरील नागरी विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतरच पुरंदर विमानतळाला परवानगी देण्याची अट संरक्षण मंत्रालयाने घातली आहे. मात्र विकासकामांसाठी आतापर्यंत ६५० कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय धावपट्टीच्या विस्तारासाठी ‘ओएलएस’ सर्व्हेला परवानगीही दिली आहे.

काही दिवसांत हवाईदलाची १३ एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत खर्चिलेल्या ६५० कोटींचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोहगाव विमानतळ हे देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक आहे. प्रवासी सुविधा व संख्येत हे विमानतळ देशात नवव्यास्थानी आहे. दररोज ९७ हून अधिक उड्डाणे तर १९४ हून अधिक विमानांची वाहतूक येथून होते. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठी मोठ्या वेगाने पावले पडत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विमानतळाच्या विकासकामांवर खर्च करून जर काही वर्षांनी हे विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद केले जाणार असेल तर हा खर्च का करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 लोहगाव विमानतळ :

१९४ : दैनंदिन विमानांची वाहतूक

३१ हजार : दैनंदिन प्रवासी संख्या

१० : पार्किंगची ठिकाणे

१० : एरोब्रिज

२ : प्रवाशांसाठी टर्मिनल

कार्गो टर्मिनल : मालवाहतुकीसाठी सुविधा

प्रस्तावित कामे...

१) ‘पार्किंग बे’ची संख्या वाढविणे

२) ‘रिमोट बे’ची निर्मिती

३) धावपट्टीचे विस्तारीकरण

४) नवीन कार्गो टर्मिनल

५) जुने व नवीन टर्मिनल एकमेकांना जोडणे
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group