रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचे दहीहंडी फोडून आंदोलन
रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचे दहीहंडी फोडून आंदोलन
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनहित कक्ष विधी विभागातर्फे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात प्रतीकात्मक दहीहंडी फोडून निषेध करणारे आंदोलन करण्यात आले.

शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून, नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, हे दिसून येते त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे मनपा प्रशासनाचा भोंगळा कारभार,

तसेच दत्तक नाशिक घेण्याच्या बाता करणार्‍या दत्तक पित्याला नाशिक शहराचा पडलेला विसर याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनहित कक्ष विधी विभागातर्फे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात प्रतीकात्मक दहीहंडी फोडून निषेध करण्यात आला, तसेच प्रशासनाला येणार्‍या पाच दिवसात, तसेच मनापासून येणार्‍या पाच दिवसांत नाशिक शहर हे खड्डेमुक्त नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरामध्ये मोठ्या स्वरूपात जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, मनोज घोडके, प्रफुल्ल बनबेरू, अमित गांगुर्डे, सौरभ खैरनार, अक्षय खांडरे, रोहन जगताप, महिंद्रा डहाळे, तेजस वाघ, रोहित शिंदे, स्वप्नील दहीकर,राजू शिंदे, रोहित वैद्य, आकाश ठाकरे, पंकज दुसाने, नितीन अहिरराव आदींसह मोठ्या स्वरूपात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

MNS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group