बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन
बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन
img
DB

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयराव तथा आप्पा साळवी यांचे निधन झाल्याची दु;खद घटना घडली आहे.

शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आप्पा साळवी यांनी वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दु;खद माहिती मिळताच, शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला आहे. 

अनेक राजकिय व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी सांयकाळी त्यांची प्रकृती अचानक अस्थिर झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group