घराणेशाहीवरुन एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, दौरा करायचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. आमच्या स्वच्छता दौऱ्यामुळे पक्षातील अनेक वर्षांची घाण देखील साफ केली आहे. उद्धव ठाकरे स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत. घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या काय त्यांनी सांगितली पाहिजे. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना पक्षातील नेत्यांना स्वत:च्या सवंगड्यांप्रमाणे वागवत होते. मात्र, उद्धव ठाकरेपक्षाला स्वत:ची प्रायव्हेड लिमिटेड कंपनी समजतात. सहकाऱ्यांना ते घरगडी किंवा नोकर समजात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान सुरु आहे. यावेळी ते बोलत होते.
स्वच्छतेसाठी लोक चळवळ निर्माण करणार ; एकनाथ शिंदे
स्वच्छतेसाठी आम्हाला लोक चळवळ निर्माण करायची आहे. स्वच्छ भारत मोदीजींनी सुरु केले तेव्हा लोक चेष्टा करत होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानचे महत्व आज देशाला समजले आहे. महाराष्ट्रात देखील डीप क्लीन ड्राईव्हबाबत जागृती निर्माण होत आहे. डीप क्लीन ड्राईव्हची चळवळ आम्ही सर्व महाराष्ट्रभर राबवत आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, स्पर्धा लोकांना कळते. बाळासाहेबांचे राम मंदिर बांधण्याचे स्वप्न होते ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलेले आहे. जगाला माहिती देशाला माहिती आणि यांचे राम मंदिराच्या बद्दल वेगळीच प्रेम आहे. 'मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे' असे म्हणून उद्धव ठाकरे चेष्टा करत होते.
मात्र, आज नरेंद्र मोदींनी मंदिर बांधलेही आणि आता त्याचे उद्घाटनही होतंय. राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही. परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीवर राजकारण करतात. प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेतात त्यामुळे जनता चांगले ओळखून आहे. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवेल, असेही एकनाथ शिंदे या वेळी बोलताना म्हणाले.