राज्य सरकारचा मोठा निर्णय ; सोमवारची 'ईद ए मिलाद'ची शासकीय सुट्टी रद्द
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; सोमवारची 'ईद ए मिलाद'ची शासकीय सुट्टी रद्द
img
Dipali Ghadwaje
ईद-ए-मिलादच्या सुट्टी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. ईद मिलाद मुस्लिम धर्मियांचा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन  असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. 

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी देण्यात आली होती. मात्र आता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.

यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश शासनाने काढला आहे. 

इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईद-मिलाद-उन-नबी हा दिवस पैंगबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. इस्लाममध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव जुलुस या कार्यक्रमाचे आयोजन करतात. 

दरम्यान, मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी अंनत चतुदर्शी आहे. या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत मोठ्या उत्साहात बाप्पााच्या विसर्जनाचा थाट असतो. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पााच्या मिरवणुका निघतात. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.दिवसा सुरू झालेली मिरवणुक पहाटेपर्यंत असते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group