बॉलीवूड ची टॉप ची अभिनेत्री आणि चाहत्यांना तिचा अदांनी भुरळ पाडणारी एव्हर ग्रीन ऍक्टरेस ऐश्वर्या राय हिने आयफा अवॉर्ड पटकावला असून ऐश्वर्या राय हिला पोन्नियिन सेलवन 2 या सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा अवॉर्ड मिळाला. तर अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम महिला या कॅटेगिरीत आयफा अवॉर्ड देण्यात आला.
या अवॉर्ड शोला भारतीय सिने इंडस्ट्रीतील ग्लॅमरस कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यात समांथा रूथ प्रभू, चिरंजीवीस एआर रहमान, राणा दग्गुबाती हे साऊथ इंडियन कलाकार सहभागी झाले होते. तर बॉलिवूडमधून ऐश्वर्या राय, शाहीद कपूर, कृति सेनन, करण जोहर, जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी उपस्थिती लावली होती.