वणी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार
वणी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार
img
Dipali Ghadwaje
वणी प्रतिनिधी : वणी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरुच असुन द्राक्ष बागांवर पावडर फवारणी रात्रीच्या सुमारास करत असताना बिबट्याने ट्रॕक्टरवर झेप घेतली मात्र चालक व मजुरांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या पळुन गेला.

याबाबत अधिक माहीती अशी की, वणी शिवारात भुषण घडवजे यांच्या द्राक्ष बागेत ट्रक्टरने द्राक्ष बागेत फवारणीचे काम सुरु होते. अचानक बिबाट्याने ट्रॕक्टरच्या बोनेट(ईंजिन) वर झडप घातली  त्यावेळी चालक व सोबत असलेले मजुर घाबरले. व आरडाओरडा केल्याने बिबट्या पळुन गेला मात्र  बिबट्याने जगदंबा देवी संस्थान सदस्य गणेश देशमुख यांच्या शेतीमधे प्रवेश केला. सकाळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळुन आले. 

याची माहीती मिळताच वनविभागाने या ठिकाणी परीसरात पिंजरा लावल्याची माहीती देशमुख यांनी दिली. घडवजे व देशमुख यांचे शेतीक्षेत्रातील अंतर जवळ आहे. तसेच या परीसरात वनविभागाचे 120 हेक्टर जंगल असुन बिबट्याला तेथे लपण्यासाठी जागा आहे तसेच येथे दोन पाझर तलाव असुन पिण्यासाठी पाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या बिबट्याचा वावर वाढल्याने परीसरातील शेतकर्यांमधे भितीचे वातावरण आहे. 

सध्या द्राक्ष बागांमधे फवारणीचे काम सुरु आहे. दिवसा विजेची समस्या तर रात्री बिबट्याची भिती यामुळे या कामाचा खोळंबा होत असुन बिबट्याच्या दहशतीमुळे मजुरांमधे भितीचे वातावरण असुन द्राक्षबागांमधे काम करण्यासाठीची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

VANI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group