सप्तशृंगी देवीच्या तांबुलतीर्थ कुंडाच्या डाव्या बाजूला जंगलात उंबराच्या झाडाला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सोमवार (दि.२५) रोजी सकाळी सदर सप्तशृंगी गडावर सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांना जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना एका ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.यानंतर डॉ. प्रशांत बहिरम यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कळवणचे पोलिस निरिक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गद्शनाखाली त्याठिकाणीच मृतदेह दफन करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शरद शिंदे, आदेश भामरे, निलेश शेवाळ, सचिन राऊत करत आहेत.