नवीन दारू धोरण लागू , 99 रुपयांमध्ये एक बाटली, ''या'' राज्याच्या सरकारची सर्व्हर सिस्टीमच हँग
नवीन दारू धोरण लागू , 99 रुपयांमध्ये एक बाटली, ''या'' राज्याच्या सरकारची सर्व्हर सिस्टीमच हँग
img
दैनिक भ्रमर
आंध्र प्रदेशमध्ये सरकरने नवीन दारू धोरण लागू केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये आता 99 रुपयांमध्ये 180 एमएल दारू मिळणार . हे दारू धोरण झाल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने दुकानांसाठी टेंडर काढले. ही टेंडर भरण्यासाठी इतक्या जणांनी अर्ज केले की सरकारची सिस्टीमच हँग झाली. नवीन दारू धोरणाच्या दुकानाच्या टेंडर प्रक्रियेचा 11 ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे.

तसेच , आंध्र प्रदेश सरकारने दारूच्या दुकानांचं लायसन्स मिळवण्यासाठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जारी केली आहे. पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर होती, पण राज्य सरकारने ही तारीख सोमवारपर्यंत वाढवली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 14 ऑक्टोबरला लॉटरी काढली जाईल. यानंतर लॉटरीमध्ये जिंकलेल्या दुकानदारांना लायसन्स मिळेल.

दरम्यान, दारूच्या दुकानांसाठी 11 ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबरला लॉटरीच्या माध्यमातून दुकानदारांचं नाव घोषित केलं जाईल, याच दिवशी दुकानदारांना लायसन्स दिलं जाईल. लायसन्स मिळालेले दुकानदार 16 ऑक्टोबरपासून दारूचं नवीन दुकान उघडू शकतात. सरकारने नव्या दारू धोरणाला अंतिम रूप दिलं आहे. हे नवीन दारू धोरण 30 सप्टेंबर 2026 पासून प्रभावी होईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group