भीषण ;  BMW च्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, 100 मीटर अंतरावर सापडला मृतदेह
भीषण ; BMW च्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, 100 मीटर अंतरावर सापडला मृतदेह
img
दैनिक भ्रमर
अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांचा रिपोर्ट पाहाता हे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढला आहे. हे अपघात कधी चालकांच्या चुकीमुळे घडतात, तर बहुतांश प्रमाणात दुसऱ्या वाहन चालकाच्या किंवा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांमुळे होतात. ज्यामध्ये काहीजण किरकोळ जखमी होतात, तर काहींना आपले प्राण गमवावे लागते.

अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झाल्याची घटना चेन्नई येथे गंघडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात\बाईकचालक 100 मीटर लांब फेकला गेला. व्हिडीओ पत्रकाराचा म्हणजेच फोटोग्राफर पत्रकाराचा भरधाव कारच्या धडकेनं मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. हे प्रकरण चेन्नईतील आहे. इथे मदुरोवायल-तांबरम एलिव्हेटेड बायपासवर बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने कुमारचा मृत्यू झाला.अपघातानंतर कार चालकाने गाडी सोडून दिली आणि घटनास्थळावरुन पळ काढला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रदीप कुमार असे असून तो एका तेलगू वृत्तवाहिनीचा कॅमेरापरसन होता आणि शहरात पार्ट टाईम रॅपिडो चालक म्हणून काम करत होता. तो आपल्या रॅपिडो ड्यूटीवर असताचा त्याला मागून भरधाव BMW कारनं धडक दिली. ज्यामुळे त्याचा जागीत मृत्यू झाला.

दरम्यान ,घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून खराब झालेली दुचाकी शोधून काढली. तसेच, घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर कुमारचा मृतदेह सापडल्यानंतर लक्षात आले की त्याचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हायवेवरून फेकला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलीस बेपत्ता लक्झरी कार चालकाचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group