धक्कादायक प्रकार : स्वतःच्याच मुलीचे तुकडे-तुकडे करुन आईने खाल्लं काळीज ; कुठे घडली घटना
धक्कादायक प्रकार : स्वतःच्याच मुलीचे तुकडे-तुकडे करुन आईने खाल्लं काळीज ; कुठे घडली घटना
img
DB
झारखंडमधील पलामू येथे एका दीड वर्षांच्या मुलीची तिच्या आईनेच अंधश्रद्धेतून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी हा प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याच्या संशयाला दुजोरा दिला. जिल्ह्यातील हुसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराड गावात ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी संशयीत आरोपी गीती देवी हिला अटक केली असून तिची चौकशी सुरु आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव गीता देवी असून, खराड गावातील अरुण राम यांची पत्नी असून तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी गीता देवी हिने तिच्या दीड वर्षाच्या मुलीची अंधश्रद्धेतून हत्या करून तिला मातीत पुरले. शिवाय तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिचा कलेजा स्वतः खाल्लाचा संशयही आहे. या बाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गीता देवीने आपल्या मुलीची हत्या करून घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिकनी बरवधोरा जंगलाजवळ पुरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गीतादेवी आपल्या मुलीला घेऊन जंगलात गेली. तेथे या दोघी निर्वस्त्र झाल्या. त्यानंतर गीतादेवीने काही मंत्र-तंत्र वाचले आणि मुलीची हत्या करुन तिला पुरुन टाकले.

त्यानंतर ती रात्री विचित्र अवस्थेत गावात पोहोचली. पलामू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. अंधश्रद्धेच्या नावाखाली 'तांत्रिक सिद्धी' मिळवण्यासाठी गीतादेवीने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे . मुलीचे तुकडेतुकडे करुन नंतर तिचं काळीज आईनेच खाल्लाने एकच खळबळ उडाली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group