लाडक्या बहिणींना आता 2500 रुपये मिळणार, शपथ घेताच घेतला पहिला...
लाडक्या बहिणींना आता 2500 रुपये मिळणार, शपथ घेताच घेतला पहिला...
img
Dipali Ghadwaje
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. यानंतर हेमंत सोरेन यांनी मैय्या सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती 2500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार  

झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या 12 इतकी आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची पथ दिली. शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत मैय्या सन्मान योजनेतील रक्कम  एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2500 रुपये मिळतील. 

केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे संकेत देखील हेमंत सोरेन यांनी दिले. महसूल विभागातर्फे खाणींवरील कर वाढवण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. 
 
दरम्यान, महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु असून महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील महिलांना या योजनेनुसार नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. महिलांना 7500 रुपये मिळाले असून डिसेंबर महिन्याची रक्कम मिळताना ती 1500 रुपयांप्रमाणं मिळणार की 2100 रुपयांप्रमाणं मिळणार हे पाहावं लागेल. 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group