'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटीत बदल होणार ? आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटीत बदल होणार ? आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. दरम्यान या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभेत झाला. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले. परंतु यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून या योजनेत बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर येत आहे. त्यासंदर्भात तत्कालीन महायुती सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण केले आहे. या योजनेत कोणताही बदल झालेला नाही? असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान , ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. या योजनेत शासनाकडून पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे आता महायुतीचे सरकार आल्यामुळे या योजनेची रक्कम २१०० रुपये होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group