जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक, 5 दहशतवादी ठार, सुरक्षा दल अलर्ट मोडवर
जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक, 5 दहशतवादी ठार, सुरक्षा दल अलर्ट मोडवर
img
Dipali Ghadwaje
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले आहेत.

या इन्काऊंटरमध्ये २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर सुरक्षा दलाने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग पीएसमधील कद्दर गावात ही चकमक सुरू होती.

यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. इंडियन आर्मीच्या चिनार कॉर्प्सने याबाबत माहिती दिली की, कद्देर गावाच्या आसपास काही दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली त्यानंतर भारतीय सैन्याने कुलगाम परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. त्यात सैनिकांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या तितक्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्याला सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group