राज्यात बिबट्यांची दहशत वाढली !
राज्यात बिबट्यांची दहशत वाढली ! "या" ठिकाणी युवकावर प्राणघातक हल्ला
img
Dipali Ghadwaje
अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ही  घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ बिबट्याने युवकावर हल्ला केला. या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे. बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकावर प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे.

दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group