मालेगाव बांगलादेशी रोहिग्यानचे आश्रयस्थान; सोमय्यांचा आरोप
मालेगाव बांगलादेशी रोहिग्यानचे आश्रयस्थान; सोमय्यांचा आरोप
img
दैनिक भ्रमर
मालेगाव - मालेगाव शहरामध्ये बांगलादेशी रोहिग्याना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कारखाना सुरू आहे आणि आत्तापर्यंत 1000 पेक्षा अधिक नागरिकांना या ठिकाणी भारतीय होण्यासाठी कागदपत्र मिळाले असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मालेगावमध्ये व्होट जिहाद झाल्यानंतर याप्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी आज नवीन पाऊल पुढे टाकले आहे. या संदर्भामध्ये सोमय्या यांनी लँड जिहाद असल्याचा आरोप केला असून या बरोबरीनेच आता त्यांनी त्याचा पुढील भाग सांगताना बांगलादेशी रोहिग्याना भारतीय करण्याचा कारखाना या ठिकाणी सुरू आहे असा आरोप भाजपच्या मालेगाव येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी केला. सोमय्या पुढे म्हणाले की, 1969 च्या जन्म आणि मृत्यू कायद्यात बदल करण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात फ्रॉड करून मालेगावमध्ये 30 डिसेंबरपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी यांनी 1110 लोकांना जन्म दाखला मिळाले असल्याचे मान्य केले असून अजूनही 400 अर्ज हे प्रलंबित आहेत. मालेगाव मध्ये सुमारे 1500 लोक हे बांगलादेशी रोहिग्या मध्ये असल्याचे मान्य केले आहे.

ते पुढे म्हणाले की, त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्राची चौकशी होणार असून भारतीय असल्याचा जन्माचा दाखला त्यांना कसा मिळाला गॅजेटनुसार ते कसे आले, 50 दिवसांच्या आत नोंदणी अर्ज करावा लागतो, 82 वर्षापासून दोन वर्षाच्या लोकांना असे दाखले दिले जात आहेत असाही दावा त्यांनी केला. सोमय्या पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त यांनी हे जन्म दाखले देऊन टाकलेले आहेत. एकाच पत्त्यावर एकाच घरातील चार जणांना केवळ मालेगावमध्ये कसे दाखल मिळतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी. या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करत एसआयटीची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली. सोमय्या पुढे म्हणाले की पंधराशे लोकांचा शोध घेतला जाणार आहे. मालेगाव मधील राजकारणी या बांगलादेशी रोहिग्याना दाखले मिळवण्यासाठी मदत करत आहेत हे देशविरोधी मोठे षडयंत्र मालेगावमध्ये होत असून हे त्यांचे आश्रयस्थान बनत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group