नाशिक :- नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापला गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पाथर्डी फाटा परिसरात घडली. सोनू धोत्रे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वत्र उत्साह असताना दुसरीकडे धोत्रे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. पाथर्डी फाटा परिसरात आज दुचाकीने सोनू देवळाली गावातून आपल्या बहिणीला पाथर्डी फाटा येथे घेण्यासाठी जात होता.
त्यावेळी नायलॉन मांजाने त्याच्या गळा कापला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सोनूचे लग्न ठरले होते. मे मध्ये त्याचे लग्न होते. सणानिमित्त नाशिकमध्ये आपल्या घरी आला होता.
बंदी असतानाही नायलॉन मांजा अनेक ठिकाणी पकडला जात आहे. तरीही अनेक ठिकाणी चोरट्या पद्धतीने हा मांजा विक्री केला जातं आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.