यूट्यूबर विजेता एल्विश यादवविरोधात एफआयआर दाखल ;  नेमकं प्रकरण काय?
यूट्यूबर विजेता एल्विश यादवविरोधात एफआयआर दाखल ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवचे नाव सतत वादात राहताना दिसत आहे. एल्विश यादवसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोएडा रेव्ह पार्टी प्रकरणातल्या साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी एल्विशविरोधात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बिग बॉस 18 मध्ये, त्याने मीडियाला पेड म्हटल्याने तो खूप ट्रोल झाला होता. एवढच नाही तर, काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. आता या रेव्ह पार्टीमधल्या साक्षीदाराला धमकावल्याबद्दल एल्विश यादवविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.  

पीपल फॉर ॲनिमल्सचा कार्यकर्ता आणि रेव्ह पार्टी प्रकरणातला साक्षीदार सौरभ गुप्ताने एल्विशविरोधात एफआयआर दाखल केलं आहे.  गाझियाबादमधील नंदग्राम पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सौरभने एल्विश यादववर गंभीर आरोप केले आहेत. सौरभने सांगितले की, एल्विश यादव त्याच्या कारमध्ये त्याच्या मागे त्याच्या सोसायटीपर्यंत आला आणि त्याला धमक्या देऊ लागला. सौरभच्या म्हणण्यानुसार, एल्विशने खोटी ओळख देऊन सोसायटीत प्रवेश केला.

सौरभने असंही म्हटलं आहे की, एल्विश यादवने सौरभ आणि त्याच्या भावाला अपघाताच्या स्वरुपात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच याशिवाय सौरभने एल्विश आणि त्याच्या साथीदारांवर सौरभ आणि त्याच्या कुटुंबाविषयी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे.

नोएडा पोलिसांसोबतचे काही व्हिडिओ व्हायरल 

सौरभने सांगितलं की, त्याचे आणि गौरवचे नोएडा पोलिसांसोबतचे काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहे. एल्विशच्या विरोधात कट रचतोय, असं या व्हिडिओद्वारे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सौरभला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सौरभला त्याचं फेसबुक अकाउंटही बंद करावं लागलं.

सौरभने पोलिसांकडे तक्रार करताना एल्विशचा एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये एल्विशने सौरभ गुप्ताचं अपहरण करण्याची आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं दिसत आहे.

याच सर्व आरोपांमुळे एल्विशविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींनंतर पोलीस आता एल्विश यादववर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group