सापाचं विष प्रकरणात मोठा खुलासा! पैसे कमवणं नाही तर 'हा' होता एल्विशचा हेतू
सापाचं विष प्रकरणात मोठा खुलासा! पैसे कमवणं नाही तर 'हा' होता एल्विशचा हेतू
img
दैनिक भ्रमर
सिद्ध यूट्युबर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणात दोषी आढळला आहे. रेव्ह पार्टीमध्ये एल्विश सापाचं विष पुरवत असल्याचा खुलासा झाल्यानंतर या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. त्याला अटक होऊन दोन दिवस झाले आहेत. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा करण्यामागील त्याचे कथित हेतू उघड झाले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे मिळवणं हा एक हेतू होता. पण, 'चाहता वर्ग वाढवणं' हा त्याचा मुख्य हेतू होता, असं समोर आलं आहे. आपला 'स्वॅग' दाखवण्यासाठी त्याने सापाच्या विषाचा आधार घेतला.

एल्विशला स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सोमवारी समोर आलेल्या नवीन अहवालत एका पोलीस सूत्राने केलेल्या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. एल्विशने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे, असा दावा पोलीस सूत्राने केला होता.

स्वॅग दाखवण्याचा हेतू

एका पोलीस सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं होतं की, चौकशीदरम्यान एल्विश यादवने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. सापाचं विष पुरुवून ‘स्वॅग’ किंवा ‘भौकाल’ म्हणजेच दरारा निर्माण करणं हा त्याचा उद्देश होता, असं अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. 'आपण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना अजिबात घाबरत नाही आणि आपण पाहिजे ते करू शकतो,' अशी प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण करण्याचा त्याचा हेतू होता.

'या' दमदार खेळाडूची 'दिल्ली कॅपिटल्स'च्या कर्णधारपदी निवड

सापाचं विष असल्याचे पुरावे

सहाहून अधिक पार्ट्यांमध्ये सापाचं विष वापरलं गेल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या सर्व पार्ट्या एल्विशशी संबंधित असल्याचा दावाही पोलीस सूत्रांनी केला आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, संबंधित पार्ट्यांना उपस्थित राहिलेल्या लोकांची ओळख पटवली जात आहे. सापाचे विष वापरल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एल्विशला रविवारी नोएडा येथे अटक करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवल्यास, पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर झाल्याचं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात स्पष्ट झालं आहे. एफएसएल अहवालानुसार, सर्पमित्रांकडून जप्त करण्यात आलेले विष क्रेट प्रजातीच्या भयंकर सापांचं होतं. गेल्या वर्षी एक नोव्हेंबर 2023 ला पीएफएच्या तक्रारीवरून एल्विश यादवसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group