माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत यांचा मुलाचे अपहरण झाल्याच्या चर्चा सुरु असताना सावंतांचा मुलगा स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तानाजी सावंत यांचा मुलगा कौटुंबिक वादातून रागाने बाहेर पडला असल्याची माहिती समोर येत असून रुसून गेलेला मुलगा अखेर पुणे विमानतळावर उतरला आहे .
दरम्यान , पुणे पोलीसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पडले. पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेची राज्यात जोरदार चर्चा आहे.
संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते. परंतु तानाजी सावंत यांचा वट पाहून पुणे पोलिसांना तक्रार घ्यायला लागली. सायंकाळी साडे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांनी लेकाच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून त्यांच्या लेकाविषयी सगळी माहिती घेऊन संबंधित यंत्रणांना कामाला लावले.
सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले. पुणे पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटीमार्फत सूत्रे हलवून हवेतूनच विमान मागे फिरवले. चेन्नईला न उतरताच विमान हवेतूनच माघारी फिरले. रात्री आठ वाजून २० मिनिटांनी सावंतांच्या मुलाचे खासगी विमान पुणे विमानतळावर लँड झाले.