मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी ; वाचा सविस्तर
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सीजनची सुरुवात तशी खास झालेली नाही.  दरम्यान जसप्रीत बुमराहच्या समावेशाकडे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचे डोळे लागले आहेत. कारण जसप्रीत बुमराह या टीमचा हुकूमाचा एक्का आहे. टीमला गरज असताना बुमराह नेहमीच विकेट काढून देतो. आता याच जसप्रीत बुमराह संदर्भात मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे.

जसप्रीत बुमराहच IPL 2025 मध्ये खेळणं सध्या कठीण दिसतय. त्याच्याबाबत नवीन अपडेट आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चिततेच सावट आहे. त्याचवेळी आणखी एक गोलंदाज आकशदीप 10 एप्रिलपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करु शकतो.

बुमराहबद्दल आधी अशी बातमी होती की, तो 1 एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्सच्या चमूत दाखल होईल. पण आता बातमी अशी आहे की, त्याच्या कमबॅकची तारीख निश्चित नाहीय. त्याच्या टीममध्ये समावेशासाठी एप्रिलचा मध्य उजाडेल असं आता बोललं जातय.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट आहे. पण BCCI च्या मेडीकल टीमला असं वाटतं की, तात्काळ त्याचा वर्कलोड वाढवणं हे संकटाला निमंत्रण देण्यासारख आहे. त्यांनी तूर्तास बुमराहला अजून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे इंग्लंडमध्ये होणारी टेस्ट सीरीज कारण आहे. IPL 2025 नंतर इंग्लंडमध्ये ही कसोटी मालिका होईल.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group