प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला सुरु होणार आयपीएल २०२५
प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला सुरु होणार आयपीएल २०२५
img
Dipali Ghadwaje
क्रिकेटप्रेमी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा आणि आयपीएल २०२५ मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना यासाठीचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शन अनेक खेळाडूंचं भवितव्य ठरणार असून  फ्रेंचायझी मजबूत संघ तयार करण्यासाठी स्टार खेळाडूंवर बोली लावतील. मात्र ऑक्शनपूर्वीच आयपीएल 2025 च्या तारखा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील 3 सीजनच्या तारखांबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे. 

मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंवर लागणार बोली? 

22-26 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे.  तर याच दरम्यान रविवार आणि सोमवारी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन पार पडेल. यंदाही ऑक्शनमध्ये 10 संघाचा सहभाग असून यात केवळ 204 स्लॉट्स रिकामे आहेत. तर तब्बल 575 खेळाडूंना ऑक्शनसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल ऑक्शनपूर्वीच बीसीसीआयने आयपीएल 2025 चं नाही तर आयपीएल 2026 आणि 2027 सुरु होण्याच्या आणि फायनलच्या तारखा सुद्धा ठरवल्या आहेत. 

कधी सुरु होणार आयपीएल 2025?

आयपीएलचा 18 वा सीजन हा पुढील वर्षी 14 मार्च रोजी सुरु होईल. तर फायनल सामना हा 25 मे रोजी पार पडेल. त्यानंतर आयपीएल 2026 चा सीजन हा 15 मार्च रोजी सुरु होईल तर याचा फायनल सामना हा 31 मे रोजी होईल. तर आयपीएल 2027 चा पहिला सामना हा 14 मार्चला खेळवण्यात येईल तर फायनल सामना हा 30 मे रोजी पार पडेल. आयपीएलने या तारखा ठरवल्या असल्या तरी यात भविष्यातील परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group