राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये लवकरच वाढ होणार, अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
परिवहन मंत्र्यांनी माणगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली. सरनाईकांच्या या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचं वातावरण आहे.
याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भातील मागणीवर निर्णय घेतला जाईल, हे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय.
माणगाव इथं महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी प्रताप सरनाईक बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून ५३ टक्के करावा, अशीमागणी आहे. याबाबत सरकार सकारात्मक आहे, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं आहे.