Nashik : खुुटवडनगरला फटाक्यांचे रॉकेट शिरले घरात, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
Nashik : खुुटवडनगरला फटाक्यांचे रॉकेट शिरले घरात, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- फटाक्यांमधील रॉकेट घरात शिरल्याने लाखो रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाल्याची घटना खुटवडनगर परिसरात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की शैलेश सुंदरम्‌‍ हे खुटवडनगर पोलीस चौकीशेजारील सुरेश बापू प्लाझा या इमारतीत राहतात. त्यांच्याकडे दिवाळीनिमित्त त्यांची बहीण व तिचे कुटुंबीय आले होते. भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी करून सुंदरम्‌‍ व त्यांच्याकडील पाहुणे हे बाहेर फिरायला गेले होते.

रात्री दहा वाजेच्या सुमारास फटाक्यांमधील एक रॉकेट त्यांच्या गॅलरीतून मध्ये शिरले. या घरात सुंदरम्‌‍ यांच्या बहिणीने आणलेल्या नवीन साड्या, दोन लॅपटॉप, दिवाळीचे नवीन कपडे, सोफा, पलंग, गाद्या या सर्व वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुंदरम्‌‍ हे घराबाहेर असल्याने त्यांना या घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाचे कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत घरातील बऱ्याचशा वस्तू जळून खाक झाल्या होत्या. घरात असलेल्या आणखी काही वस्तू तेथील नागरिकांनी बाहेर काढल्याने त्या वाचल्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group