प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंग क्लिन बोल्ड; लवकरच अडकणार विवाहबंधनात
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंग क्लिन बोल्ड; लवकरच अडकणार विवाहबंधनात
img
दैनिक भ्रमर

भारतीय संघाकडून खेळताना भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करणारा रिंकू सिंग प्रेमाच्या मैदानात क्लिन बोल्ड झाला आहे.

टीम इंडियाचा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहित समोर आली आहे. सपा खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत त्याच्या लव्हस्टोरीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. रिंकू सिंग आणि खा. प्रिया सरोज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा अन् लग्नसोहळ्याची तारीखही फिक्स करण्यात आली आहे. 

8 जून रोजी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम लखनऊमधील एका सात तारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. रिंकू आणि प्रिया सरोज 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. 

रिंकू सिंग भावी पत्नी प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर मतदारसंघातून खासदार आहेत. 2024 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या बीपी सरोज यांचा 35850 मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला. प्रिया सरोजच्या वडिलांचे नाव तूफानी सरोज असून ते मछलीशहर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. सध्या ते केरकत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group