बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खानच्या घरातून बाहेर जाताना पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळत आहेत. जवळपास 25 आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी पोहचले होते. आता आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानच्या घरी का आली याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
जवळपास 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानला भेटायला त्याच्या वांद्र्यातील घरी पोहोचली. दरम्यान, मीडिया रिपोर्टमध्ये असंदेखील सांगण्यात आलं आहे की, 25 आयपीएस अधिकारी आमिर खानची भेट घेण्यासाठी गेले होते. पण आमिर किंवा त्याच्या टीमनं याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. पण यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर आमिर खानचे चाहते विविध प्रकारचे अंदाज बांधत आहेत. माध्यमांनी आमिर खानच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक येण्याचं कारण माहीत नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून मात्र मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.