'आमिर खान माझ्या घरी यायचा, बेडरूममध्ये...', ममता कुलकर्णीचा ३० वर्षांनी मोठा खुलासा
'आमिर खान माझ्या घरी यायचा, बेडरूममध्ये...', ममता कुलकर्णीचा ३० वर्षांनी मोठा खुलासा
img
वैष्णवी सांगळे
१९९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक असलेल्या ममता कुलकर्णी यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांचे काही अनुभव आणि आठवणी जाग्या केल्या आहेत. ममता कुलकर्णी यांनी अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडलं. 2025 मध्ये त्या भारतात परतली आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी यांनी त्या काळात चित्रपटांच्या सेटवरचे त्यांचे अनुभव आणि आठवणी सांगितल्या आहेत.

ममता कुलकर्णी म्हणाली,  "बघा, मला खूप आनंद आहे की, मला 1990 च्या दशकात काम करता आलं. मी आमिर खानसोबत काम केलंय, मी शाहरुख खानसोबत काम केलंय... आम्ही कधीही एकमेकांच्या धर्माकडे पाहिलं नाही. खरं सांगायचं तर, मी आता काय म्हणू?" पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "चित्रपटाच्या सेटवर आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या आणि कलाकार अनेकदा एकमेकांच्या घरी तयार व्हायचे आणि नंतर शूटिंगसाठी निघून जायचे..."

तेव्हा व्हॅनिटी व्हॅन सामान्य नव्हत्या, त्यावेळी कलाकार एकमेकांच्या घरी जाणं पसंत करायचे. बाजी फिल्मच्या शूटिंगवेळी आमिर खान अनेकदा माझ्या घरी यायचा, माझ्या बेडरूममध्ये कपडे बदलायचा.  कारण त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या. 'जर व्हॅन असेल तर मी तिथे कपडे बदलेन' असं नव्हतं. जर आमिर खान लोखंडवालामध्ये शूटिंग करत असेल तर तो थेट माझ्या घरी येऊन माझ्या बेडरूममध्ये कपडे बदलायचा."

ममता कुलकर्णी म्हणाली, "आम्ही एकमेकांच्या घरी जायचो, तिथं तयारी करायचो आणि मग थेट शूटिंगला जायचो. 'बाजी'चं काम संपल्यानंतर मी आणि आमिर खान थेट माझ्या घरी यायचो आणि तो माझ्या स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायचा."जेव्हा ती आमिर खान आणि शाहरुख खानसोबत परदेशात जायची तेव्हा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवरही हीच जवळीक दिसून येत असे, असंही तिने सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group