
दैनिक भ्रमर ( प्रतिनिधी ) इगतपुरी - इगतपुरीजवळ पाडळी मुंढेगाव दरम्यान कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनचे ब्रेक जाम झाल्याने इंजिनमधून धूर निघत आहे. इंजिन मधून धूर निघाल्याने कामायनी एक्सप्रेस मुंढेगावजवळ थांबवण्यात आली आहे. सुदैवाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. इंजिनची तपासणी सुरू करण्यात आली असून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी करण्यात आली आहे. मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी असल्याने प्रवाशांचा मात्र खोळंबा झाल्याचे चित्र आहे.