दारणा नदीत आंघोळीसाठी गेले होते दाम्पत्य; पतीचा बुडून मृत्यू
दारणा नदीत आंघोळीसाठी गेले होते दाम्पत्य; पतीचा बुडून मृत्यू
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी - इगतपुरी तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात १ जण बुडून मयत झाला आहे.

इगतपुरी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन तत्परतेने कार्यवाही केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. काल दुपारी बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर (वय ४५), त्याची पत्नी सखुबाई पुनाजी वीर (वय ३८, रा. बोर्ली वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी) हे दोघे सोबतच आंघोळीसाठी गेले होते.

यावेळी पुनाजी नामा वीर हे पोहत असताना बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात भावली धरणात ५ तर वैतरणा धरणात बुडून २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत  आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group