साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुष याचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘रांझणा’ चित्रपटानंतर त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. ऐश्वर्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. घटस्फोटानंतर धनुष एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जातय.
हे ही वाचा !
सध्या बीटाऊनमध्ये धनुषआणि मृणाल ठाकूर हॉट टॉपिक आहेत. दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा रंगली आहे. 'सन ऑफ सरदार २' सिनेमाच्या स्क्रीनिंगला धनुष आणि मृणालमध्ये जवळीक पाहून चर्चांना उधाण आलं. त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय.
हे ही वाचा !
अनेक मीडिया रिपोर्ट्सने मृणाल आणि धनुषच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं आहे. रिलेशनशिप नवीन असल्याने सध्या दोघांनाही ते जाहीर करायचं नसल्याने ते यावर बोलणार नाहीत असंही समजतंय. सध्या दोघांचाही मित्रपरिवार त्यांच्या एकत्र येण्याने खूप खूश आहे. दोघांचे विचार, मूल्ये एकमेकांशी खूप जुळतात. ते सोबत नक्कीच शोभून दिसतात अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
< >