धक्कादायक ! पोटचा मुलगाच वैरी झाला; क्षुल्लक कारणावरून पित्याची हत्या
धक्कादायक ! पोटचा मुलगाच वैरी झाला; क्षुल्लक कारणावरून पित्याची हत्या
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : दिवसेंदिवस नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. जळगाव मधूनही असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दारु पिण्याच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना इथे उघडकीस आली आहे. 

... तर गणेश मंडळांवर होणार दंडात्मक कारवाई

नेमकं काय घडलं ? 
जळगाव जिल्ह्यातील चांदसर या गावामध्ये ही घटना घडली आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला होता. याचवेळी दारू पिण्याच्या कारणावरून छगन कोळी आणि समाधान यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या समाधानने लोखंडी विळ्याने वडील छगन कोळी यांच्या पोटावर वार केले आणि यात ते गंभीर जखमी झाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! कांदा उत्पादकांना १८ कोटींचे अनुदान

त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ ऑगस्ट सोमवारी रोजी पहाटे ३ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात समाधान कोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group