धक्कादायक ! अनेक दिवसांनंतर बायको माहेराहून घरी आली, पतीने केलं असं काही की तुम्हालाही बसेल धक्का...
धक्कादायक ! अनेक दिवसांनंतर बायको माहेराहून घरी आली, पतीने केलं असं काही की तुम्हालाही बसेल धक्का...
img
Vaishnavi Sangale
पती पत्नी मध्ये होणारे वाद, चारित्र्यावर होत असलेली चिखलफेक यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पत्नीच्या वादाचा भयानक शेवट या नात्यात पहायला मिळाला. प्रियंका खुशाल भदाणे आणि तिचा पती खुशाल भदाणे या पती पत्नी मध्ये नेहमी वाद होत होते. यातच पती कायम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्या कारणाने अधिक वाद व्हायचे. जारगाव येथील खुशाल भदाणे हा बांधकाम कामगार होता. पती- पत्नीत सतत वाद होत असल्याने प्रियंका गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरी गेली होती.

बरेच दिवस पत्नी माहेरी असल्याने खुशाल याने लहान मुलांसाठी पत्नीला काही दिवसांपूर्वीच पाचोरा येथे आणले होते. तरीही त्यांच्यातील वाद काही कमी झाले नाहीत. यातच १९ जुलैला रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. मात्र या वादातून खुशालने २० जुलैला पहाटे चारच्या सुमारास उठून झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा अर्धा गळा चिरला. त्यानंतर पोटावर सपासप वार केले.

चाकूने वार केल्यामुळे प्रियांका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशा परिस्थितीत खुशालनेही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईच्या किंकाळ्यांमुळे झोपलेली दोन्ही लहान मुले जागी झाली. त्यांनी आईला पाहून आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी गळफास घेणाऱ्या पतीस रोखून त्याचे प्राण वाचवले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर खुशाल भदाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group