सिन्नर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र
सिन्नर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिन्नर तालुक्यातील तब्बल ७९ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १०(१-अ) नुसार अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी ही कारवाई केली.

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. २०१९ मध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडणूक लढत उमेदवारांनी विजय संपादन केला होता. या सर्व विजयी उमेदवारांनी नियमाप्रमाणे विहित मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्रे जमा करणे आवश्यक होते; परंतु मुदत संपूनही उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. 

शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊनही सदस्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.संधी देऊनही संबधित सदस्यांनी त्यांचे जात पडताळणीचे वैध प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर केली नसल्याने आता थेट अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ग्रामपंचायत सदस्यांवर झालेल्या या कारवाईने तालुक्याची राजकीय समीकरणे देखील बदलण्याची शक्यता आहे. 

कोण कोणत्या गावांतील सदस्य झाले अपात्र ?
पांढुर्ली, मलढोण, दातली, निमगाव देवपूर, सोनांबे, चंद्रपूर, धोंडबार, सांगवी, धारणगाव, ब्राह्मणवाडे, मऱ्हळ खुर्द, देशवंडी, निहऱ्हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, आटकवडे, जामगाव, सावता माळीनगर, दत्तनगर, पांगरी बुद्रुक, कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, वडझिरे, हिवरे, मुसळगाव, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बुद्रुक, कुंदेवाडी, सोनगिरी, कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी,  विंचूर दळवी, घोटेवाडी, फर्दापूर, दहीवाडी, औंढेवाडी, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खुर्द, कोमलवाडी बोरखिंड,  सरदवाडी.
Sinnar |
इतर बातम्या
Join Whatsapp Group