काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. इंस्टाग्रामवर तुमच्या मित्रांचे किंवा डिजिटल क्रिएटर्सचे 3D स्टॅच्यू तुम्हाला दिसत असतील . राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, सामान्य व्यक्ती, पाळीव प्राणी आणि आवडत्या खेळाडूंना 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करून हा ट्रेंड इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाचं म्हणजे, या टूलचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या सॉफ्टवेअरची गरज नाही. हे पूर्णपणे मोफत आणि वापरण्यास खूपच सोपं आहे. तुम्हालाही जर अशी इमेज बनवायची असेल तर ती कशी बनवता येईल, चला जाणून घेऊया.
हे 3D मॉडेल बनवण्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करा
1: गुगल एआय स्टुडिओ ओपन करा
तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा आणि त्यात Google AI Studio असे सर्च करा. त्यानंतर, Try Gemini हा पर्याय निवडा. त्यानंतर उजव्या बाजूच्या पॅनेलमध्ये Nano Banana निवडा आणि गुगल अकाऊंट साईन इन करा. त्यानंतर युजर अटी मान्य करा, ज्यानंतर तुम्हालाही हे टूल वापरता येईल.
2: फोटो अपलोड करा
आता Run बटनाच्या शेजारील "+" चिन्हावर क्लिक करा आणि Upload Image किंवा Upload File हा पर्याय निवडा. तुम्ही तुमचा सेल्फी, तुमच्या पाळीव प्राण्याचा फोटो किंवा अगदी निसर्गरम्य दृश्यही वापरू शकता.
3: 3D मॉडेल प्रॉम्प्ट पेस्ट करा
तुम्ही फोटो अपलोड केल्यावर, खालील प्रॉम्प्ट (कमांड) कॉपी करून चॅटबॉक्समध्ये पेस्ट करा आणि Run बटनावर क्लिक करा:
4: इमेज डाउनलोड करा आणि शेअर करा
एकदा तुमचे मॉडेल तयार झाल्यावर, तुम्ही ती इमेज विनामूल्य डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही ती इंस्टाग्राम, X किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. व्हॉटसअप स्टेटसलाही तुम्ही ही इमेज ठेवू शकता.
ChatGPT वापरून अॅक्शन फिगर थीम इमेजेस कशा तयार करायच्या?
१) चॅटजीपीटी अॅप किंवा वेबसाइट उघडा
२) तुमची इच्छित इमेज अपलोड करा.
३)तुमच्या वापरासाठी कोणती इमेज चांगली काम करते हे तुम्ही ठरवू शकता आणि त्यानुसार या प्रॉम्प्ट्समध्ये बदल करू शकता.
3D मॉडेल तयार करताना प्रॉम्प्ट्समध्ये मुख्य विषय, कला शैली, प्रकाशयोजना, पार्श्वभूमी आणि वातावरण यांचे तपशीलवार वर्णन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ““Create an image of me as a real-life action figure. Be specific as possible based on what you know about me. And put multiple interesting things that represent who I am inside the packaging. I've attached an image of me for reference.” अशा स्पष्ट सूचना AI ला अचूक परिणाम देण्यास मदत करतात.
गुगलचे ‘जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज’ आणि चॅटजीपीटीचे इमेज जनरेशन टूल मोफत उपलब्ध आहेत, ज्यामुळे कोणालाही विशेष कौशल्यांशिवाय 3D मॉडेल तयार करता येतात. चॅटजीपीटी दररोज १५ फोटो मोफत तयार करण्याची मर्यादा देते, तर गुगलचे टूल साध्या प्रॉम्प्ट्सद्वारे जलद मॉडेल निर्मिती सक्षम करते. यामुळे हा ट्रेंड सर्वांसाठी सुलभ आणि आकर्षक बनला आहे.