गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन ! आचार्य देवव्रत राज्याचे नवीन राज्यपाल
गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन ! आचार्य देवव्रत राज्याचे नवीन राज्यपाल
img
वैष्णवी सांगळे
सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर ते नाव समोर आलं आहे, गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

नागपुरमध्ये खासदाराच्या कारचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या वतीनं उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. सी.पी. राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार,आचार्य देवव्रत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल. आचार्य देवव्रत यांना दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खळबळजनक ! दोन दिवसांपूर्वी वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत, आज तिथेच चिमुकलीचा मृतदेह सापडला

कोण आहेत आचार्य देवव्रत ?  
आचार्य देवव्रत यांचा जन्म 18 जानेवारी 1959 रोजी हरियाणातील समालखा येथे झाला. त्यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलात प्राचार्य म्हणून पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीचा प्रसार केला. ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केले, तर जून 2019 पासून ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. गुजरातमध्ये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांना चालना दिली. 

विशेषतः नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केलं. त्यांनी 'जीवामृत' खताचा प्रसार केला. आर्य समाजाचे प्रचारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य देवव्रत यांनी सामाजिक सुधारणा, गोसंरक्षण आणि पर्यावरण जागृतीसाठी विशेष योगदान दिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group