राज्यातील अनेक जिल्हयात सध्या वरुणराजा कोपल्याच चित्र आहे. मुसळधार पावसाने उभी शेती पीक जमीनदोस्त झाले आहेत तर जनजीवन देखील विस्कळीत झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. फक्त शेतातील मातीच नाही जनावर देखील वाहून गेली आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता अनेक लोक पुढे येऊ लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ २२१५ कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली असून पुढील काही दिवसांत ही मदत शेतकऱ्यांपुढे पोहोचेल असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे आता मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय विद्यमान आमदार, खासदार यांनी आपले 1 महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देऊ केले असून सरकारी कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत. राज्यातील सर्व शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. आता, लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळानेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 50 लाख रुपये मदत करण्यात आली असून मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 लाखाचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द जाणार केला आहे.