प्रायव्हेट व्हिडीओ बनवले, मुख्य भूमिकेची ऑफर देऊन ड्रग्ज दिले... सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर निर्मात्याला अटक
प्रायव्हेट व्हिडीओ बनवले, मुख्य भूमिकेची ऑफर देऊन ड्रग्ज दिले... सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर निर्मात्याला अटक
img
वैष्णवी सांगळे
सिनेसृष्टीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार लैंगिक छळ, फसवणूक, धमक्या आणि ब्लॅकमेलसह प्रसिद्ध निर्माते हेमंत कुमार याला अटक करण्यात आली आहे.  मागण्या नाकारल्यानंतर त्याने तिला गुंडांकडून धमकावल्याचंही तिने म्हटलंय. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांना तात्काळ निर्मात्याला अटक केली आहे. 


नाशिकमध्ये एकाच दिवसात तिसरा खून; मुलाने केली आईची हत्या

अभिनेत्रीचा आरोप आहे की २०२२ मध्ये हेमंत कुमारने तिला त्यांच्या "रिची" चित्रपटात मुख्य भूमिका ऑफर केली होती. या संदर्भात एक करार करण्यात आला होता, ज्यामध्ये तिला दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ज्यापैकी ६०,००० रुपये आगाऊ देण्यात आले होते. पण, त्यानंतर सिनेमाचं शुटिंग आणि त्यानंतर रिलीज होण्यासाठी उशीर होत असल्यामुळे ती पुरती निराश झाली. याचदरम्यान निर्मात्यानं अभिनेत्रीकडे नको त्या गोष्टींचं फेवर मागितलं. 

१२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; केक कापला, दुधाने अभिषेक केला पुढे...

अभिनेत्रीनं आरोप लावत पोलिसांना सांगितलं की, काही अश्लील सीन करण्यासाठी तिच्यावर प्रेशर टाकलं गेलं. तसेच हेमंतनं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. २०२३ मध्ये मुंबईत एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान, हेमंतने तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळले आणि ती दारूच्या नशेत असताना तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला, असा दावाही तिने केला. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यासाठी हा व्हिडिओ वापरला. तिने विरोध केल्यावर, हेमंतने त्याच्या गुंडांचा वापर करून तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.

निर्मात्यानं अभिनेत्रीला शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एक चेक दिला. पण हा चेक बाऊन्स झाल्याचं देखील अभिनेत्रीनं सांगितलं. इतकंच नव्हे तर, अभिनेत्रीच्या समंतीशिवाय चित्रपटात अश्लील सीन शूट करण्यास भाग पाडलं. तसेच हे सीन्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यास जबरदस्ती देखील केली. अभिनेत्रीच्या या तक्रारी आणि आरोपांनंतर राजाजीनगर पोलिसांनी हेमंतला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.   


इतर बातम्या
Join Whatsapp Group