सोपा पासवर्ड महागात पडला ! रूग्णालयातील महिलांचे व्हिडिओ लीक, क्लिप पॉxxx साईटवर अपलोड
सोपा पासवर्ड महागात पडला ! रूग्णालयातील महिलांचे व्हिडिओ लीक, क्लिप पॉxxx साईटवर अपलोड
img
वैष्णवी सांगळे
एक छोटी चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय गुजरातमधील राजकोट येथील एका रूग्णालयाला आला आहे. राजकोटच्या पायल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले हे प्रकरण भारतातील सर्वात गंभीर सायबर घोटाळ्यांपैकी एक आहे. हॅकर्सने डिफॉल्ड पासवर्ड वापरून हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही सिस्टममध्ये प्रवेश केला. तसेच स्त्रीरोग वॉर्डमधील महिलांचे खासगी व्हिडिओ चोरले. त्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ परदेशी पोर्नोग्राफिक नेटवर्क्सना विकले.



बऱ्याचदा, आपण सोशल मीडिया अकाउंट्स, घरातील वाय फाय किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पासवर्ड इतके सोपे सेट करतो की, कुणीही त्याचा अंदाज लावू शकतो. मात्र, हे अत्यंत धोकादायक आहे. राजकोटच्या पायल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्येही हेच झालं. रूग्णालयात 'admin123' या डीफॉल्ड पासवर्डमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचे खासही व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ पॉर्न साईट्सवर अपलोड करण्यात आले.

तपासात असे दिसून आले की, हे नेटवर्क जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत सक्रिय होते. हॅकर्सनी देशभरातून अंदाजे ५० हजार क्लिप्स चोरल्या आहेत.  दोन यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. टेलिग्राम ग्रुपला देखील याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ ७०० ते ४हजार रूपयांपर्यंत विकण्यात आले.

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि दिल्ली यांसारख्या शहरांसह देशभरातील ८० सीसीटीव्ही सिस्टम हॅक करण्यात आले. हे प्रकरण जून असलं तरी तुम्ही पावलोपावली सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियामुळे जीवन सोपे झाले असले तरी ते गुंतागुंतीचे देखील झाले आहे. हे व्हिडिओ जून महिन्यापर्यंत टेलिग्रामवर विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group