मोठी बातमी समोर आली आहे. अनेक वर्षपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले आहे. अखेर राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेेबर
मतदान - 2 डिसेंबर
निकाल - 3 डिसेंबर
आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली. या घोषणेनुसार आता राज्यात एकूण 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यात 15 नव्या नगरपंचायती आहेत.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
नाशिक -49
पुणे -60
कोकण - 17
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55