सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे होणार नागपूरची सून , सुप्रिया सुळेंचे होणारे जावई नक्की आहे तरी कोण ?
सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे होणार नागपूरची सून , सुप्रिया सुळेंचे होणारे जावई नक्की आहे तरी कोण ?
img
वैष्णवी सांगळे
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं स्थान असलेल्या सुळे कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालं आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि निर्मात्या स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून रेवती सुळेंच्या लग्नाविषयी माहिती दिली. 

पाणीपुरी खाताना हे काय झालं, पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आला अन...

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार ? अजितदादांच्या निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात शंका; रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ

सारंग लखानी कोण आहेत? 
सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group